कै. संभाजीराव गरड बहुउद्देशिय संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव यांचा भव्य नागरी सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 3, 2022

कै. संभाजीराव गरड बहुउद्देशिय संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव यांचा भव्य नागरी सत्कार

  कै. संभाजीराव गरड बहुउद्देशिय संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव यांचा भव्य नागरी सत्कार

कै.वसंतराव गरड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकिय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्यांचा सन्मान

            मोहोळ (कटुसत्य वृत्त):- भारत सरकारच्या वतीने पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलेल्या एम्सचे माजी अधिष्ठाता व आयोडीन मिठाचे जनक  डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव यांचा दि. ५ मे रोजी मोहोळ येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कै.वसंतराव गरड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकिय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या सोलापूरचे डॉ. नितीन तोष्णीवाल,डॉ. फईम गोलीवाले यांना ' धन्वंतरी ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केरळच्या राज्यपालांच्या हस्ते डॉ. पांडव यांचा सन्मान होणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गरड यांनी दिली.

             डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव हे जिल्हयातील पहिलेच पद्मश्री प्राप्त असुन करमाळा तालुका हे त्याचे जन्मगांव तर मोहोळ हे त्यांचे आजोळ आहे . जगातील सुमारे साठ देशाचे वैद्यकिय सल्लागार तसेच जागतिक स्तरावर सुमारे ४०० प्रबंधाचे वाचन केलेले डॉ. चंद्रकांत पांडव यांचा नागरी सत्कार केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ यांच्या हस्ते देशभक्त कै. संभाजीराव गरड बहुउद्देशिय संशोधन संस्था तसेच पद्मश्री डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव सत्कार समितीच्या वतीने करण्यात येणार आहे . याचवेळी कै.वसंतराव गरड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकिय क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या डॉ. नितीन तोष्णीवाल , डॉ. फईम गोलीवाले यांना ' धन्वंतरी ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले , महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री अमीत देशमुख, खासदार सिद्धेश्र्वर स्वामी ओमराजे निंबाळकर ,, माजी आ. राजन पाटील,आ. यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, दिल्लीचे डॉ. श्याम रघुनंदन,डॉ. गोविंद कुलकर्णी, एम. आय. टी. चे विश्वनाथ कराड, पुण्याचे डॉ. घनवट आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचीही माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष तसेच संस्थेचे  सचिव प्रतापसिंह गरड यांनी दिली.यावेळी  सत्कार समितीचे सदस्य डॉ. कौशिक गायकवाड , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड , प्राचार्य डॉ. दत्तात्रय तिकटे, माजी प्रा. बाजीराव जोशी , अदिनाथ काळे, प्रा.एन. जे. पाटील आदी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages