सापटणे (टें) येथील युवकास"पाॅक्सो" कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 8, 2022

सापटणे (टें) येथील युवकास"पाॅक्सो" कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

सापटणे (टें) येथील युवकास"पाॅक्सो" कायद्याअंतर्गत  मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

            टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): दिनांक 2 मे 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पाॅक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील 9 महिन्यांपासून अटकेत असणाऱ्या आरोपी प्रकाश उर्फ भैय्या मुकुंद ढवळे यास जामीन मंजूर केला आहे.

            याप्रकरणी थोडक्यात हकिकत अशी की मौजे सापटणे (टें) येथील रहिवासी असणार्या पिडीत मुलीच्या टेंभुर्णी पोलिस स्टेशन मधील दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 512/2021 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम  ३७६(२)(एन), ३६३, ३४२, ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 आणि 6 अंतर्गत आरोपी प्रकाश यास अटक करण्यात आली. 

            तद्नंतर आरोपीच्या कुटुंबियांनी अ‍ॅड.अजिंक्य संगीतराव यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तद्नंतर पिडीत तरुणी व आरोपी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते व प्रथमदर्शनी वैद्यकीय तपासातून पिडीत तरुणीच्या शरीरावरती कोणत्याच प्रकारच्या जखमा दिसून येत नाहीत असा आरोपीच्या वकीलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सन्माननीय उच्च न्यायालयाने  दिनांक 2 मे 2022 रोजी रुपये 25000 इतक्या जातमुचलक्यावरती व काही अटी शर्तीनुसार आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. याप्रकरणी आरोपीच्या वतीने अ‍ॅड.  शैलेश चव्हाण,  अ‍ॅड. दयानंद पाटील आणि अ‍ॅड.अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages