500 रुपयांची लाच स्विकारताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील सदर बझार पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यास 500 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.पोलीस नाईक नाना बेशा शिंदे नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे, राहणार अरविंद धाम पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. केवळ 500 रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने सापळा रचून पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली.
यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाई मध्ये तक्रारदार यांना सदर बझार पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे दि. ०२.०५.२०२२ दि.१०.०५.२०२२ या कालावधीमध्ये दैनदिन हजेरी लावण्यात आली होती. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्यावयाचे प्रमाणपत्र देण्याकरीता आरोपी शिंदे यांनी तक्रारदार यांना ५००/- रुपये लाचेची मागणी करून लाभ रक्कम स्विकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
No comments:
Post a Comment