शिवाजी पॉलिटेक्निक ,सांगोला येथे अक्षांत फाउंडेशन आयोजित नॅशनल लेव्हल टेक्नॉलॉजी एक्जीबीशनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सध्या टेक्नॉलॉजी विश्वात चालू असलेल्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञांनाची माहिती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील व्हावी म्हणून अक्षांत फाउंडेशन आणि गुरुजी एज्युकेशन,पुणे (सपोर्टटेड बाय सिंबॉइसिस टेक्नॉलॉजी बिझनेस इंक्युबेटर) एक दिवसीय नॅशनल लेव्हल टेक्नॉलॉजी एक्जीबीशन २३ एप्रिल,२०२२ रोजी शिवाजी पॉलिटेक्निक ,सांगोला,सोलापूर येथे आयोजित केले होते.
या प्रसंगी शिवाजी पॉलिटेक्निक चे विश्वस्त श्री.गायकवाड सर,प्राचार्य श्री.रणजित देशमुख सर ,अक्षांत फाउंडेशन च्या संस्थापिका,अध्यक्ष कू.दिपाली सरगर ,सचिव कुणाल माने,उपसचिव नितीन काळे,गुरुजी एज्युकेशन चे गुरुजी एज्युकेशन चे डायरेक्टर प्रताप पवार (आर अँड डी हेड), तुषार सूर्यवंशी (हेड ऑफ रोबोटिक्स डिपार्टमेंट), विशाल औताडे (हेड ऑफ आई ओ टी डिपार्टमेंट) उपस्थित होते.
सध्या टेक्नॉलॉजी विश्वात मॅजिक वाटणाऱ्या टेक्नॉलॉजी म्हणजे व्हरच्युआल रिॲलिटी, ऑगमेंटेड रिॲलिटी, मेटावरस, होम ओटोमॅशन, सेटलाईट मॉडेल , इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक्सपेरीन्स युझिंग व्हरच्युअल रिॲलिटी, ड्रोन् टेक्नॉलजी, ह्यूमन टू ह्युमन ब्रेन इंटर्फेस डेमो जवळपास ४००-५००विद्यार्थ्यांना देण्यात आला.त्यावर विद्यार्थ्यांच्या शंका आणि प्रश्नाचं निरसन ही केले गेले.शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील कुतूहल, उत्सुकता पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
शिवाजी पॉलिटेक्निक चे प्राचार्य,शिक्षकवृंद आणि विश्र्वतांच विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, महाविद्यालयातील शिस्त आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा ध्यास हा खरच भारावून टाकणारा आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये असे उपक्रम राबवले पाहिजेत, असे मत अक्षांत फाउंडेशन च्या अध्यक्षा आणि संपूर्ण टीम ने व्यक्त केले आहे.तसेच अक्षांत टीम चे सहकारी अविनाश रुपनवर,अक्षय सरगर,प्रताप पवार,उज्ज्वला मोटे,कुणाल माने यांचे विशेष आभार मानले.
0 Comments