Hot Posts

6/recent/ticker-posts

कवी शरद पाटील यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये सन्मान

कवी शरद पाटील यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये सन्मान 

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील आढेगांव येथील कवी शरद पाटील यांचा काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक १७ मार्च २०२२ रोजी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

          यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका श्यामला पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अनिल दीक्षित होते.कवी शरद पाटील यांनी राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळवली आहेत त्यांचे लिखाण वास्तव परिस्थितीवर आधारित असून ते आपल्या लेखनीतून समाजप्रबोधनाचे काम करतात.काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था पुणे जिल्हा शाखेच्यावतीने पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील लक्ष्मी चौक सभागृहांमध्ये राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कवी संमेलन,केसरी पुस्तक प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या काव्य संमेलनांमध्ये महाराष्ट्रातील अनेक कवी सहभागी झाले होते.

          यावेळी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव,निलेश बोराटे, रमेश बोराडे,राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजू पाडेकर,उपाध्यक्षा प्रांजली काळबेंडे,कार्याध्यक्ष नीरज आत्राम,आयोजक पुणे जिल्हाध्यक्ष सुनिता दीपक पडवळ इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणा व्होरा यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments