Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले यांना अभिप्रेत असणा-या शिक्षणाची गरज- कल्याण आखाडे ; सांगोला येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महात्मा फुले यांना अभिप्रेत असणा-या शिक्षणाची गरज- कल्याण आखाडे ; सांगोला येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

          सांगोला (कटूसत्य वृत्त): महात्मा फुले यांनी समाजाच्या हिताचे शिक्षण दिले. महिला शिकल्या पाहिजे यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिले अन् त्यातून आज अनेक महिल विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आज मुलीला जन्माला येण्यापूर्वीच तीचा घात केला जातो. समाजात आजही शिक्षणाची जागृतता खुप महत्वाची आहे. म्हणून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मत सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगोला येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले. यादरम्यान ओबीसी विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सांगोला येथील महात्मा फुले चौकात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी डॉ. प्रभाकर माळी, चेअरमन सीए के. एस. माळी, माजी नगराध्यक्ष मारूती आबा बनकर, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, गजानन बनकर, अँड. भारत बनकर, विजय राऊत, तुकाराम कुदळे, मधुकर बनसोडे, अशोक बनसोडे, आनंदा राऊत, महाराष्ट्र माळी समाज महासंघ युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ राऊत, सचिन फुले, डाॅ. सचिन गवळी, वंसत गोडसे, रामचंद्र बनकर, रामचंद्र जाधव, डाॅ. संतोष पिसे, दिलीप राऊत, अरूण केदार, बापूसाहेब ठोकळे, नानासाहेब लिगाडे, पियुष पाटील, पञकार सतीश सावंत, अतुल पवार, प्रविण नवले, स्वाती मगर, इंजिनिअर रमेश जाधव आदींसह मान्यवरांकडून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

          या कार्यक्रमास महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम कुदळे, सावता परिषद मुख्य संघटक संतोष राजगुरू, युवक नेते सयाजी बनसोडे आदी उपस्थित होते.

          सायंकाळी महात्मा फुले यांचे प्रतिमेची भव्य पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात संयोजकांकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये ८६ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोमनाथ राऊत यांनी केले.

          या कार्यक्रमात महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ यांचेकडून डाॅ. सुशांत बनसोडे, पञकार प्रमोदराजे बनसोडे, शैक्षणिक क्षेत्रात प्रा. सविता राऊत, योगा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रत्नप्रभा माळी, संगीत दयानंद बनकर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय विविध स्पर्धेत विजयी स्पर्धेकांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments