Hot Posts

6/recent/ticker-posts

अण्णा व दादांनी एका विचारातून तालुक्याला दिशा देण्याच काम केलंय - माजी आमदार राजन पाटील

 अण्णा व दादांनी एका विचारातून तालुक्याला दिशा देण्याच काम केलंय - माजी आमदार राजन पाटील 



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- लोकनेते बाबुराव अण्णा पाटील व स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड यांनी स्वतंत्रपूर्व काळापासून मोहोळ तालुक्याला एक दिशा देण्याच काम केलं असल्याने स्वातंत्र्यसेनानी स्व. संदिपान दादा गायकवाड हे मोहोळ शहरासह तालुक्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते. लोकनेते अण्णांचे सहकारी असलेल्या दादांची माजी खूप कमी वयात ओळख झाली त्यामुळे आदरणीय दादांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आज दादांच्या चौथ्या स्मृतिदिनी गायकवाड परिवाराने घेतलेला कृषी पुरस्काराचा आणि पत्रकार प्रशिक्षणाचा स्तुत्य उपक्रम निश्चितपणे आदर्शवत असून यापुढील काळातही दादांच्या स्मृतिदिनी असेच लोकहितोपयोगी उपक्रम राबवण्यात यावेत. हीच  दादांना खरी आदरांजली ठरेल असे भावनिक गौरवोदगार मोहोळचे माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांनी काढले.स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संदिपान दादा गायकवाड बहुउद्देशीय संस्था मोहोळ, मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित मोहोळ व जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथील स्वातंत्र्यसेनानी संदिपान गायकवाड मंगल कार्यालयात आयोजित विविध कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानावरून राजन पाटील बोलत होते.याप्रसंगी ढोकबाभळगाव येथील प्रगतशील शेतकरी महादेव पासले व सौ.शुभांगी पासले या दांम्पत्यांनी आ.यशवंत माने यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड कृषी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 'कृष्णलीला' या साप्ताहिकाच्या अंकाचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. तर पत्रकार प्रशिक्षण व कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केंद्र सरकार माध्यमांची गळचेपी करीत असल्याचे उदाहरणासह सांगून सनसनाटी आरोप केला. पत्रकारांनी विरोधकाची भूमिका बजावून शासन व प्रशासनाला वटणीवर आणण्याचे काम केल पाहीजे. अशीही अपेक्षा व्यक्त करून उपस्थित पत्रकारांना चांगले मार्गदर्शन केले.प्रारंभी मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थाचे चेअरमन कौशिक तात्या गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी तहसीलदार प्रशांत बेंडसे पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक सुजाता माळी, सहायक निबंधक विद्याधर माने, सुग्रीव व्यवहारे, कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक फारुख बागवान, दै.कटूसत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे, माजी जि. प.सदस्या सीमाताई पाटील, भाजपचे राष्ट्रीय नेते शंकरराव वाघमारे, प्रगतशील बागायतदार शिवाजीराव गणपाटील, उद्योगपती वसंतराव मालुंजकर पाटील, प्रगतशील बागायतदार तुकाराम डुबल, सतिश काळे, भाऊसाहेब सलगर, वैभव गुंड, सुरेश गायकवाड, व्हाईस चेअरमन व नगरसेवक प्रमोद डोके, मुस्ताक शेख, गणेश ननवरे, श्रीकांत गायकवाड, माजी नगराध्यक्षा शाहीन शेख, अभिजीत गायकवाड, श्रध्दा गायकवाड, सतीश भोसले, चंद्रकांत वाघमोडे, जगन्नाथ कोल्हाळ, तानाजी रोहिटे, ब्रह्मदेव भोसले, चंद्रमौळी पतसंस्थेचे चेअरमन राजेश खपाले, व्हाईस चेअरमन राकेश देशमाने, संचालक संजय विभुते, रघुनाथ भोसले, सुरेश घाटगे, महावीर चटके, संतोष भोसले, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक सुधीर गायकवाड, मोहोळ नागरी पतपुरवठा संस्थेचे व्यवस्थापक मुस्ताक शेख, नितीन गुंड, विजय काळे, नितीन टेळे, भाऊसाहेब गायकवाड, चंद्रमौळी औद्योगिक सहकारी वसाहतीचे व्हा. चेअरमन प्रसाद गूरव, माजी चेअरमन दिलीप देशपांडे, श्रद्धा गायकवाड, तृप्ती गायकवाड, सौ. नंदा गायकवाड, सौ. वंदना गायकवाड, सौ. विजया गायकवाड, अशोक गायकवाड, शैलेश गावडे, शुभम माने, बाळासाहेब शिंगाडे, बापू ढोले, विक्रम गुंड, असलम खान, ईश्वर स्वामी, सुधीर डोके, सौ. शुभांगी माने, अॅड. मनोहर हिंगणे, भैय्या कोरे, अनिल नाईक, प्रवीण सोनवणे, कोकाटे, बाबा मुलाणी, सचिव संघटनचे अध्यक्ष नारायण गुंड, भारत बाबर, बाजीराव जोशी, बाळासाहेब गायकवाड, संजय देशमुख, श्रीकांत गायकवाड, उद्योजक राम कदम, पांडुरंग शिंदे, श्रीधर थिटे, मोहन माळी, सदाशिव मेंढे, शिवाजी दळवी, दिलीप पाटील, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुनियोजन गायकवाड परिवार व त्यांच्या सहकार्यांनी केले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments