Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला सखी वन स्टॉप सेंटरचा आढावा ; मानधन आणि इतर खर्चास दिली मान्यता

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला सखी वन स्टॉप सेंटरचा आढावा ; मानधन आणि इतर खर्चास दिली मान्यता

          सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर शहरात महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत सखी वन स्टॉप सेंटर योजना चालविण्यात येत आहे, या सेंटरचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा घेतला.

        संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी आणि त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या सोयीसाठी सखी वन स्टॉप सेंटर योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. सोलापुरात हे सेंटर ऑक्टोबर 2020 पासून कार्यान्वित झाले आहे. या केंद्राकडे असलेल्या मनुष्यबळाचा मानधनाचा खर्च आणि इतर खर्चाला जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

           या केंद्रात 2020 पासून 201 महिला आल्या होत्या. यातील 186 जणांचे समुपदेशन, 58 जणांना कायदेविषयक समुपदेशन व सल्ला, 18 महिलांना विधी सेवाकडे संदर्भित केले. 55 महिलांनी आश्रय सुविधेचा लाभ घेतला. पोलीस मदत-18, वैद्यकीय सेवा-42, वृद्धाश्रम-03, पालकांकडे सुपुर्द-13, संदर्भ सेवा-8, निकाली केसेस-158 आणि चालू केसेस 43 असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी दिली.

          या केंद्राला एकूण 14 पदे मंजूर असून दोघांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या ठिकाणी पदभरतीला आणि अन्य खर्चालाही मान्यता देण्यात आली.

            बैठकीला प्रशिक्षणार्थी आयपीएस कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, नागरी सदस्य लताताई फुटाणे, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, विशेष अधिकारी  धायगुडे, सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. बी.टी. दुधभाते, केंद्र प्रशासक सुवर्णा गाडेकर आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments