वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची - जयंत पाटील
.jpg)
मुंबई (नासिकेत पानसरे): वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत आदरणीय शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
२०१४ ला मोदींना पाठिंबा... २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर अशी जोरदार खिल्ली जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची उडवली आहे.
पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरेंचा... मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी... वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
0 Comments