राज्यात भारनियमन होऊ देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
.png)
पुणे, (नासिकेत पानसरे):-राज्यासह देशात कोळश्याचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमनाचं संकट आहे. पण आम्ही भारनियमन होऊ देणार नाही. मार्केटमधून वीज खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरून वीज खरेदी करू, पण राज्यात भारनियमन होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वीज भारनियमन होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला नितीन राऊतही उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती.सर्व माहिती घेण्यात आली. सर्वांनी त्यात लक्ष घातलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेचा शॉर्टेज निर्माण झाला आहे. देशभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोळसा मिनिस्ट्रीलाही सांगण्यात आलं. कमी दिवसाचा कोळसा आहे. तो वाढवून द्या. मार्केटमध्ये जिथे वीज आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबाबतची कॅबिनेटने परवानगी दिली आहे. भारनियमन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, असं अजित पवार म्हणाले. वीज संकटात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी स्पष्ट केलं.ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. विजेची समस्या ही अपुरा कोळसा पुरवठा त्याचबरोबर उन्हाळ्यात अचानक वाढलेली मागणी यामुळे निर्माण झाली असून यावर तात्काळ तोडगा काढण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वॉर स्टेशन स्थापन करण्यात आल्या आहेत. वीज तुटवडा असणारे महाराष्ट्र हे एकच राज्य नसून, देशात २७ राज्यांमध्ये अशीच स्थिती आहे. राज्यात अखंडीत वीज उपलब्ध व्हावी यासाठी कोळसा आयात कऱण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, वीज बचत करणारी उपकरणे वापरणे, वीज वापराबाबातचे ऊर्जा परिक्षण, नादुरूस्त उपकेंद्र बंद करणे असे ऊर्जा बचतीच्या उपाय योजना करण्यावर भर देण्यात येत आहे. या शिवाय वीज निर्मितीसाठी कोळश्याचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाँशरीजमधून कोळसा आणण्यासाठी रेल्वे उपलब्ध न झाल्यास, रस्तेमार्गे वाहतूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.
0 Comments