यंदा विद्यार्थ्यी उन्हाळी सुट्टीला मुकणार, राज्यात एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू

मुंबई (कटूसत्य वृत्त):- शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टी हा अत्यंत जिव्हाळ्याची बाब आहे. त्यातही दिवाळीची आणि उन्हाळीची विद्यार्थी अतुरतेने वाट पाहत असतात. कारण या सुट्ट्यात ना अभ्यासाचे टेन्शन, ना कुठल्या परीक्षेचा ताण फक्त आणि फक्त मजा-मस्ती असते. पण यंदा विद्यार्थ्यांचा हिरमूस झाला आहे. त्याला कारण आहे. नुकतेच शिक्षण मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे गेले वर्षभर शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मध्यंतरी शाळा ऑफलाइन सुरू करण्यात आल्या. पण अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, राज्यातील शाळा १०० टक्के उपस्थितीसह सुरू कराव्यात. या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत. रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात याव असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली आहे.
0 Comments