लोकप्रतिनिधींना टार्गेट करत असाल तर बार्शी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शीचे भाजपसमर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील अवैध धंद्यांच्या पुराव्यांनिशी तक्रारी केल्या म्हणून जर तेथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमदार व त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे नियोजन करून टार्गेट करत असेल तर हे बरोबर नाही.सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, विधिमंडळाच्या सभागृहात सदस्यांनी बोलल्यानंतर प्रशासन जर दुःख धरणार असेल तर सदस्याने बोलायचं की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय.पोलीस अशाप्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीला वागणूक देत असतील तर मी स्वतः बार्शी पोलीस स्टेशनवर हजारोंचा मोर्चा घेऊन घेराव घालेन, असा इशारा देत जे चाललं आहे ते योग्य नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तिथल्या अवैध व्यवसायांच्या संदर्भात विषय मांडला.या सभागृहामध्ये राज्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्यांनी बैठक घेतली.त्याच्यात लोकप्रतिनिधी आले. त्यांनी काही पुरावे देत तक्रारी केल्या. कसे अवैध धंदे चालतात हे सांगितले.त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरश: टार्गेट करण्याचं काम चाललं आहे. राजेंद्र राऊत यांना कुठल्या तरी गुन्ह्यात घेणार आणि त्यांच्या मुलाला शंभर टक्के फसवणार असं त्यांचं नियोजन आहे. 'त्या' पीआयचे रेकॉर्ड काय? कितीदा सस्पेंड झालेत आणि कशा कशात सस्पेंड झालेत हे पहा,असे पीआय जर आपण तिथे देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छानपणे सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदारांनी गप्प बसायचं, मूग गिळून गप्प बसायचं का? असा सवाल उपस्थित केला.
0 Comments