नोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. अमजद सय्यद यांची माहिती; विविध मान्यवर राहणार उपस्थित
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-पद्मशाली चौकात वैद्यकीय क्षेत्रातील उच्च दर्जाची सेवा देणाऱ्या नोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवार २७ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नोबल हॉस्पिटल चे संचालक हदयरोग तज्ञ अमजद सय्यद यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी हॉस्पीटलचे उदघाटन समारंभ पार पडणार आहे. हा कार्यक्रम आ. प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर महेश कोठे, डॉ. अब्दुल कादरी, डॉ. इलियास शेख, मौलाना इब्राहिम कासमी, शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, नोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावंर निदान व उपचारासोबत शस्त्रक्रिया केल्या जातात. या हॉस्पीटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब (ॲन्जोग्राफी, ॲन्जोप्लॅस्टिक) ची सुविधा आहे. आयसीयू, डायलेसिस युनिट, जनरल वार्ड, स्पेशल रूम, प्रसुती गृह, सोनोग्राफी, टू डी इको व सर्व प्रकारच्या रक्त तपासणी केली जाते. दरम्यान, या हॉस्पीटलचे संचालक सुप्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. अमजद सय्यद यांनी आजपर्यंत २० हजारांहून अधिक हदयरोगाच्या रुग्णांवर उपचार करून जीवनदान दिले आहेत. डॉ. अमजद सय्यद हे मूळचे सोलापूरचे असून त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी एमबीबीएस, एमडी मेडिसन पदवी वैश्यपायन मेडिकल काॅलेजमध्ये प्राप्त केली आहे. त्यानंतर हदयविकाराच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी एसजीपीजीआयएमएस, लखनऊ येथे तीन वर्ष व केअर हॉस्पीटल बंजारा हिल्स हैदराबाद येथे पाच वर्ष कार्यरत होते. डॉ. सय्यद यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीची फिलोशिप व युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीची फिलोशिप सुध्दा प्राप्त झाली. या वर्धापन दिन कार्यक्रमास सोलापूर शहर व परिसरातील विविध संस्था, संघटना, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार असून सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. अमजद सय्यद यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस डॉ. फिरदोस सय्यद, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला, प्रशासकीय अधिकारी निलेश गवंडी व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.
0 Comments