Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; राज्यातील शाळा १००% उपस्थितीसह सुरु करण्यास परवानगी

शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; राज्यातील शाळा १००% उपस्थितीसह सुरु करण्यास परवानगी


मुंबई,(कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देभरभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं.मागील काही महिनात्यांपासून हे निर्बंध शिथिल करून हळूहळू शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. परिपत्रक जारी करून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत.

                                             

तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. कधी होणार परीक्षा इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात याव असे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती आतापर्यन्त कोरोनामुळे शाळा सुरु नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत होतं. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र यातही संपूर्ण उपस्थितीसह विद्यार्थ्यांना शाळांना परवानगी नव्हती. मात्र आता अखेर शालेय शिक्षण विभागाकडून १००  टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments