Hot Posts

6/recent/ticker-posts

तहसिल कार्यालयातील जुन्या वाहनाचा लिलाव 3 मार्चला


तहसिल कार्यालयातील जुन्या वाहनाचा लिलाव 3 मार्चला

 

 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- तहसिल कार्यालय पंढरपूर या कार्यालयाचे शासकीय वाहन टाटा सुमो, क्रमांक एम एच 13 पी.0199  या  वाहनाचे निर्लेखन करण्यात आलेले असून, सदर वाहनाचा लिलाव दिनांक 03 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता पंढरपूर तहसिल कार्यालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली आहे.

 उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्याकडून सदर वाहनाची  लघुत्तम किंमत 49 हजार 700 रुपये इतकी  ठरविण्यात आलेली असून. सदर  लिलावामध्ये भाग घेण्याकरीता 500/- रुपये अर्जाची फी  इतकी आहे.प्रत्यक्ष वाहन पाहण्याकरीता तहसील कार्यालय पंढरपूर येथे उपलब्ध आहे. 

             सदर लिलाव  मंजूर होणाऱ्या व्यक्तीस  त्याच दिवशी लिलावाच्या रकमेच्या 25 टक्के रक्कम रोखीने  भरून उर्वरित 75 टक्के रक्कम लिलावाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत भरणे बंधनकारक राहील. सदर वाहन लिलावाच्या अटी व शर्ती  तहसील कार्यालय, पंढरपूर येथे पाहण्याकरीता मिळतील.   लिलावत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी  नमूद तारखेस वेळेत उपस्थित रहावे असे ,आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments