शहरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्याना मेंदूज्वरसाठी जे ई ही लस देण्यात आली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्या बालगोपाळांना मेंदूज्वरसाठी जे ई ही लस देण्यात आली, पालकांनी न घाबरता लस द्यावी असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले.सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये लहान मुलांसाठी मेंदूज्वर या आजारावरती लसीकरण मोहीम राबविण्यात आले आहे. त्याअंतर्गत संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये मेंदुज्वरसाठी जे ई ही लस देण्यात आली. या लसीकरणाचे उद्घाटन पालिका उपायुक्त धनराज पांडे,आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे, डब्ल्यू एच ओ चे डॉ परदेशी, यांच्या हस्ते पार पडले,यावेळी संगमेश्वर पब्लिक स्कूलचे प्राचार्य शिक्षक आदींची उपस्थिती होती. यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी बालगोपाळांना जे ई लस दिली तत्पूर्वी प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डब्ल्यू एच ओ चे अधिकारी डॉ परदेशी तसेच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी लोहारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तद्नंतर इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली दरम्यान महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी या लसीकरण मोहिमेबाबत अधिक माहिती देताना पालकांनी मुलांना लस द्यावी असे आवाहन केले .यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते,त्यानंतर सेवासदन प्रशालेत ही शाळेतील मुलांना जे ई लस देण्यात आली.
0 Comments