सांगोला तलाठी कार्यालय जिल्ह्यात आदर्शवत ठरेल-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
माझी वसुंधरा अभियानात सांगोला नगरपालिकेचे नाव उज्जवल होईल
सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोला तहसिल कार्यालय परिसरात जुन्या काळातील असलेल्या तलाठी कार्यालयाचे "सुंदर माझे कार्यालय"या राज्यशासनाच्या योजनेंतर्गत लोकसहभागातून नूतनीकरण करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सदर उदघाटन प्रसंगी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,तहसिलदार अभिजित पाटील,सहायक आयुक्त लोकरे,पोलीस निरीक्षक सुहास जगताप,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,परिविक्षाधीन तहसिलदार शिंदे ,सर्व मंडलाधिकारी,तलाठी उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर होते,सदर तलाठी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना शंभरकर म्हणाले की सांगोला तलाठी कार्यालयाचे नूतनीकरणाचे कार्य तहसिलदार, तलाठी,मंडळ अधिकारी यांनी लोकसहभागातून सुशोभित केलेले कार्यालय नक्कीच कौतुकाला पात्र ठरले आहे.सूंदर माझे कार्यालय या शासनाच्या योजनेतून मार्चअखेर पर्यत सांगोला तालुक्यातील कार्यालय सूंदर आणि सुशोभित होतील,यात शंका नाही. लोकसहभागातून अशी कामे मार्गी लावण्यासाठी तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी प्रयत्न करावा आणि त्यांना त्यांना यश येईल असा आशावाद जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी तहसिलदार अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. उत्कृष्ट कार्यालय केलेबद्दल मंडलअधिकारी ननवरे आणि तलाठी विकास माळी यांचा सत्कार जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केला.सदर कार्यक्रमास नायब तहसीलदार, मंडल अधिकारी,तलाठी आणि महसूल चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments