Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसी जन्मोर्चाचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन,मच्छिंद्र भोसले आणि लक्ष्मण गायकवाड यांचा सहभाग!

ओबीसी जन्मोर्चाचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन, मच्छिंद्र भोसले आणि लक्ष्मण गायकवाड यांचा सहभाग!



मुंबई (कटूसत्य वृत्त):- ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगीत केले आहे.भटक्या व विमुक्त आणि ओबीसी समुदायाची जनगणना करण्यास कोर्टाने आदेश देवून सुद्धा केंद्र आणि राज्यसरकार राजी नाही. म्हणून ओबीसीचे राजकीय आरक्षण कोर्टाने संपविले आहे. केंद्र आणि राज्यसरकारचे नाकर्तेपणा उघड्यावर आणून त्यांचा निषेध करण्यासाठी मुंबईत मंगळवारी आझाद मैदानावर ओबीसी जनामोर्चा या संघटने मार्फत केलेल्या यशस्वी आंदोलनात मुळ भटक्या विमुक्तांच्या संघटनेचे नेते मच्छिंद्र भोसले आणि उचल्यकार लक्ष्मण गायकवाड यांनी शेकडो कार्यकर्त्या सह सहभाग नोंदविला.माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे,माजी आमदार टी.पी.मुंढे, जे. डी.तांडेल,श्री बाविस्कर, मच्छिंद्र भोसले,लक्ष्मण गायकवाड..विश्वास दोर्वेकर,महादेव शिंदे महाराज. इत्यादी प्रमुख नेत्यांनी या वेळी उपस्थित आंदोलकांना आपल्या भाषणाद्वारे मार्ग दर्शन केले.

 

Reactions

Post a Comment

0 Comments