Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार : अण्णासाहेब ढाणे रिपाईच्या साफसफाई मोहिमेने छत्रपती शंभुराजे चौक परिसर स्वच्छ.!

छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार : अण्णासाहेब ढाणे 


रिपाईच्या साफसफाई मोहिमेने छत्रपती शंभुराजे चौक परिसर स्वच्छ.!

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- प्रत्येकाची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असून अनेक चौकाला महापुरुषांची नाव देण्यात आले आहेत.तिथली स्वच्छता व त्यातलं पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी कुर्डू ग्रामपंचायत च्या वतीने सार्वजनिक ठिकाणी व छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे प्रतिपादन कुर्डूूू गावचे उपसरपंच वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांनी केले.छत्रपती संभाजी महाराज चौकातील ध्वजाचे पूजन व उद्घाटन वस्ताद अण्णासाहेब ढाणे व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप तसेच कुर्डू ग्रामपंचायत सदस्यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. छत्रपती संभाजी चौक कुर्डू येथ पंढरपूर रोड बायपास गोलाईतील साफसफाई स्वच्छता मोहीमेत येथील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी पुढे सरसावले व त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वेगळ्या अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याच्या हेतूने स्वतःच्याच हातामध्ये कुल्हाडी फावडा व खराटा घेऊन हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणची साफसफाई केली यामध्ये आर.पी.आयचे संघटन सचिव विशाल मोरे व रिपाई युवक आघाडीचे शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड,संभाजी ब्रिगेडचे कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संदीप भराटे,रिपाईचे अल्पसंख्यांक सेलचे तालुका उपाध्यक्ष इम्रान शेख,शिवसेना शहर उपप्रमुख किशोर ढवळे,यांच्या सह कुमार भेंडाळे,जयसिंग पाटील,केतन राऊत,नितीन लांडगे,बुंदी राऊत यांनी श्रमदानातून हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणची साफसफाई केली.हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल या सर्व सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना अण्णासाहेब ढाणे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांच्या या चौकाला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे काम या ठिकाणी कुर्डू ग्रामपंचायत च्या वतीने सुशोभीकरणा सह करेल यामध्ये सर्वच सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे.यावेळी सरपंच संतोष जगताप,सदस्य धनंजय गोरे,नितीन गोरे,सुधीर लोंढे,दादा अनंतकवळस,सचिव सुहास टोणपे तालुका अध्यक्ष बालाजी जगताप,तालुका उपाध्यक्ष रणजित देशमुख मनसे तालुकाध्यक्ष सागर लोकरे, द्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष शंकर नागणे,विद्यार्थी कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अजय गायकवाड,दत्तात्रय जगताप,बबलू शेख,दादा सावंत इत्यादी सह कुर्डू ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तथा आर.पी.आय व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात वाढलेली काटेरी झुडपे गवत सर्वात मोठा कहर इथे पडलेल्या दारूच्या बाटल्या सह जाहिराती ब्यानर ने छत्रपती संभाजी महाराज चौक अक्षरशा झाकून गेला होता.याकडे कोणाचेही लक्ष नव्हते परंतु दिनांक १५ रोजी संभाजी ब्रिगेडचे कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकाचे ग्रामपंचायतने सुशोभीकरण करावे अशी मागणी केल गेली,याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन त्या ठिकाणी तात्काळ पोल सह ध्वज बसवण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली, यामुळे शंभू प्रेमिन कडून या सर्वांचे कौतुक होत आहे.यावेळी सारंग गवळी मित्र परिवाराने देखील अगदी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला, दि.१५ रोजी च्या रात्री बाराच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ध्वजारोहण करून तोफांची सलामी देत तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.याप्रसंगी शिवभक्त अनिल लंगडे,सौरभ दादा परबत,दादा सुरवसे,कृष्णा क्षीरसागर,सिद्धार्थ गायकवाड,उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments