लोटेवाडी अचकदाणी महुद रस्त्याचे येत्या आठ दिवसात काम नाही सुरू झाले तर मनसे आंदोलन करणार--अक्षय विभूते

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला याचेवतीने लोटेवाडी अकदाणी महुद या रस्त्यासाठी गेले वर्षभर आवेदने निवेदने दिली आहेत.तरीही रस्ता होत नाही त्यासाठी आज शेवटचे निवेदन उप अभियंता जिल्हा परिषद बांधकांम उप विभाग सांगोला कार्यालय येथे निवेदन दिले .येत्या ४-ऑक्टोबर-२०२१पर्यंत काम नाही सुरू झाले तर ६-ऑक्टोबर २०२१ रोजी लोटेवाडी अचकदाणी महूद रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा मनसेचे सांगोला विधासभा अध्यक्ष अक्षय विभुते यांनी दिला आहे.निवदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद (भाई)बाबर मनसे विधानसभा सांगोला अध्यक्ष अक्षय विभुते, मनसे संघटक विशाल गोडसे,मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनसोडे,तालुका उपाध्यक्ष रमेश नरके, मनसे सांगोला तालुका सहकार सेना अध्यक्ष आर टी सरगर,अजिंक्य तोडकरी शहर अध्यक्ष, तालुका प्रसिध्दी प्रमुख खंडू (भाऊ)इंगोले, विष्णु खडतरे, संकेत सरगर, सुशांत ऐवळे, नवनाथ तरंगे व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments