Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 2222 कोरोना पॉझिटिव्ह,1201 झाले बरे, तर 42 मृत्यू

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 2222 कोरोना पॉझिटिव्ह,1201 झाले बरे, तर 42 मृत्यू


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे गुरुवारी सोलापूर शहरात 181 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2041 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 2222 नवे रुग्ण आढळले आहेत.    

गुरुवारी सोलापूर शहरात 2518 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 181 पॉझिटिव्ह आहेत तर 2337 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 24926 झाली आहे.

          काल शहरात तब्बल 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1101 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 21021 जण घरी परतले आहेत. तर 2804 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

          गुरुवारी ग्रामीण भागातील 12768 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 2041 पॉझिटिव्ह आहेत तर 10727 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 72965 झाली आहे.

          काल तब्बल 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1609 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 58589 जण घरी परतले आहेत. तर 12768 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments