Hot Posts

6/recent/ticker-posts

उर्वशिराजे मोहिते पाटील यांनी केला ग्रामसभा गुंडाळल्याचा आरोप

 उर्वशिराजे मोहिते पाटील यांनी केला ग्रामसभा गुंडाळल्याचा आरोप

अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये विषयाचे फक्त वाचन करण्यात आले तर आयत्या वेळचे विषय हे अनुत्तरीत राहिल्याने अकलूज ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभा गुंडाळल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या सौ उर्वशिराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गिरीराज माने पाटील,सदस्या ज्योती कुंभार , मयुर माने ,राणी बंदपट्टे, रणजितसिंह देशमुख,आदेश गोसावी, नवनाथ साठे सह जनसेवेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना सौ. मोहिते पाटील पुढे म्हणाल्या की सदर झालेल्या ग्रामसभेमध्ये आठ विषयांचे वाचन करण्यात आले पण त्यावर  सविस्तर चर्चा घेण्यात आली नाही त्यामुळे सदर विषय मंजूर झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ज्या गोरगरिबांकडून घरकुल जागेसाठी पैसे घेण्यात आले त्यांनाही न्याय न मिळाल्याचे स्पष्ट केले. गावठाण जागा शिल्लक असतानाही ती का वाटप होत नाही यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.२५ वॉश बेसिन खरेदी खर्चामध्येही तफावत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांनी सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे न्याय मागणार असण्याचे असल्याचे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments