Hot Posts

6/recent/ticker-posts

धैर्यशिल मोहीते-पाटील यांनी घेतला राजकीय संन्यासाचा निर्णय

धैर्यशिल मोहीते-पाटील यांनी घेतला राजकीय संन्यासाचा निर्णय

          अकलूज (कटुसत्य वृत्त): अकलुज ग्रामपंचायत एक जागा बिनविरोध होवुन विरोधकाकडे गेली असून याची जबाबदारी स्विकारत असल्याचे सांगत, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आपण राजकीय संन्यास घेणार असल्याचे धैर्यशिल मोहीते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

          याविषयी पत्रकार परीषदेत बोलतांना धैर्यशिल मोहीते-पाटील म्हणाले की विजयदादा व बाळदादा यांच्या शिकवणीनुसार व रणजितदादाच्या मार्गदर्शनाखाली मी अकलुज गावच्या राजकारणात गेली १३ वर्षे एक कार्यकर्ता म्हणुनच काम करत आहे. अकलुजची जनता मोहीते-पाटील परीवारावर प्रेम करणारी आहे.त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता काम करण्याची विजयदादांनी शिकवण दिली आहे.

          अकलुज नगरपरीषद होण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याने ग्रामपंचायत निवडणुका घेवु नयेत असे राज्य सरकारने निवडणुक आयोगाला कळवले होते.परंतु निवडणुक आयोगाने त्यावर निर्णय घेतला नाही.निवडणुक लागल्याने यंदाच्या निवडणुकीत महाळुंग,नातेपुते प्रमाणे अकलुज ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी अर्ज न भरण्यासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा झाली होती.यामध्ये विरोधकांच्या बरोबर चर्चा झाल्या यामध्ये शिवसेनेचे आण्णा कुलकर्णी,दत्ताआबा पवार,नामदेव वाघमारे,रिपाईचे नंदकुमार केंगार,किरण धाईंजे,मोरे परीवार,भागवत गायकवाड आदीनी सकारत्मक प्रतिसाद देत गावाच्या हितासाठी योग्य ते करण्याचे ठरवले होते.अकलुज ग्रामपंचायतचे नगरपरीषदेत रुपात्तंर झाल्यास झोपडपट्टी धारंकाना घरकुल मिळणे,पाणीपुरवठ्याचा प्रश्न,ग्रामपंचायत कामगारांना कायम होण्याचा मार्ग लागणे असे अनेक प्रश्न मार्गी लागणार होते.यासाठी ग्रामपंचायतीची निवडणुक होवु नये याकरिता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले.परंतु काही विरोधकांना हे मान्य नव्हते. त्यामुळे निवडणुक लागली व यामुळे अकलुजच्या जनतेचं मोठं नुकसान झालं आहे.या निवडणुकीत आत्तापर्यत केलेल्या विकासकामाच्या मुद्दावर निवडणुकीला सामोर जाणार आहोत.

          अकलुज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विजयदादा, बाळदादा व रणजितदादांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी चोखपणे पार पाडणे ही माझे कर्तव्य होते.परंतु माझ्या वैयक्तिक हलगर्जीपणामुळे एक जागा बिनविरोध होवुन विरोधकाकडे गेली.आम्ही प्रभाग क्रंमक ५ मधिल जागेवर एका सर्वसामान्य महीलेस उमेदवारी दिली होती परंतु त्या महिलेची फसवणुक करत व माझ्या नावाचा वापर करुन सही घेवुन उमेदवारी अर्ज काढून घेतला गेला.मी नेहमी निवडणुक कामात स्वतः लक्ष घालुन काम करत असतो,सर्व फार्म तपासत असतो परंतु बंधु शिवतेजसिंह यांच्या लग्नकार्यात असल्याने गहाळ राहीलो व त्यामुळे ही जागा बिनविरोध झाली आहे व त्याबाबतची सर्व जबाबदारी मी स्विकारत आहे.

          निवडणुकीत उभे असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेवुन तसा शब्द दिला आहे.या निवडणुकीत मी हिरारीने भाग घेवुन उर्वरित सर्व सदश्यांना निवडून आणण्याचे काम करणार आहे व त्यानंतर मी सर्व सहकारी संस्थाचे राजिनामा देवुन राजकिय संन्यास घेणार आसल्याची खळबळजणक घोषणा केली. 

          पत्रकार परीषदे बरोबर धैर्यशिल मोहीते-पाटील हे सोशल मिडीयावर फेसबुक लाईव्ह असल्याने त्यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णय सर्वत्र पसरल्याने कार्यकर्ते व राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.धैर्यशिल मोहीते-पाटील यांचेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.तर कोणत्यही परीस्थितीत धैर्यशिल भैय्या यांना राजकीय संन्यास घेवु देणार नाही असे कार्यकर्त्यांमधुन भावना व्यक्त होत आहेत.तर धैर्यशिल मोहीते-पाटील यांनी मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे.यामुळे अकलुजच्या राजकारणात एक नवे वळण निर्माण झाले असून पुढे काय याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे. 

          प्रभाग क्रंमाक ५ मधुन सर्वसाधारण जागेवर आम्ही एका सर्वसामान्य कुठूबातील महीलेला उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एका व्यक्तींने त्या महिलेकडे जावुन धैर्यशिल भैय्यानी या फाँर्मवर सह्या मागितल्याचे सांगत सह्या घेतल्या व उमेदवारी अर्ज माघारी घेवुन एक जागा बिनविरोध केली.सदर जागेवर दुसऱ्या महीलेचा पुरक उमेदवारी अर्ज होता परंतु तो अर्ज आमच्या सहकार्य यांचे कडून चुकीचा  भरला गेला.यामुळे उमेदवार बिनविरोध झाला असे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments