Hot Posts

6/recent/ticker-posts

आयकर रिटर्न देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करा

                  आयकर रिटर्न देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करा

                सोलापूर (क.वृ.) :-  सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा आयकर रिटर्न देऊन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व अशासकीय कर्मचाऱ्यांनी आयकर रिटर्न मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. परंतु अद्यापपर्यंत रिटर्न मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. 
                    कोरोना महामारीमुळे राज्य शासनानेही यंदा अजून तरी महागाई भत्ता व सातव्या वेतन आयोगाचा फरक दिला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे आयकर विभागाने आयकर रिटर्न मिळण्याची प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करावी आणि तात्काळ आयकर रिटर्न देऊन या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे व सरचिटणीस अजितकुमार संगवे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments