मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी अकलूज ते माळशिरस पदयात्रा

अकलूज दि.३(क.वृ.): गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणावर पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक वेळेस खेळवल जात आहे.आणि आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. मराठा समाजातील उच्च शिक्षित मुले.आरक्षणा मुळे बेरोजगारीत आहेत.आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कित्येक बळी गेले आहेत.याचबरोबर काल परवा बीड मधील मराठा विद्यार्थ्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापत आहे व चिघळत आहे.असे अजून किती विद्यार्थ्यांचे बळी केंद्र सरकार घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी केंद्र सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरती विचार करावा व लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज,योद्धा प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने दि. ५/१०/२०२० रोजी सकाळी ७.३० ला अकलुज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तसेच अकलुज येथील सर्व महामानवाच्या पुतळ्यांना अभिवादन करून अकलूज ,संग्रामनगर, पाटील वस्ती, वटपळी, मार्गे माळशिरस अशी पदयात्रा काढून तहसीलदार माळसिरस यांना तहसील कार्यालय माळसिरस येथे निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी तसेच माळशिरस तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन विवध संघटनांनी केले आहे.
0 Comments