लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन

तुळजापूर दि.८(क.वृ.): महाराष्ट्रातील शाळा, विध्यालये व महाविध्यालये सुरु कारा,अन्याथा सध्याचे शैक्षणिक वर्ष Drop (रद्द) करावे,या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने एकाच दिवशी (दिनांक.१०-९-२०२०)रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याच अनुसंगाने उस्मानाबाद येथेही आंदोलन केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा कार्यालया समोर घोषवाक्य फलक दाखवून सोसेल डिस्टन्स चे पालन करून शांततेत आंदोलन छेडण्यात येत असलेची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लहुजी शक्ती सेना सोमनाथ भाऊ कांबळे यानी तुळजापूर येथे (दि.८)रोजी येथील सर्कीट हाऊसमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रदैश कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड,तुळजापूर तालुकाध्यक्ष किसन भाऊ देडे आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना सोमनाथ भाऊ कांबळे पुढे म्हणाले कि कोरोना विषाणू चा विरोध म्हणून व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्रातील शाळा, विध्यालये तसेच महाविध्यालये बंद आहेत. १ सप्टेंबर पासून एसटी, उध्योग बाजार,रेल्वे,
दुकाने,हाँटेल्स,देशी दारु,बिअर शाँपी,बिअर बार तसेच काही निर्बंधसह काही सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा देत सर्व गर्दिची ठिकाणे खुली होणार,त्याच बरोबर देशामध्ये मंदिरे, चर्च,गिरीजाघर,गुरुद्वारा सुरु करण्यासाठी स्वार्थी आडमुठे लोक आंदोलने करत आहेत. मात्र देशाची भावी पिढी घडविणारी व्यवस्था अर्थात शाळा,विध्यालये व महाविध्यालये बंदच आहेत. त्यामुळेच देशाचे उद्याचे भविष्य असलेली पिढीचे शैक्षणिक नुकसान होताना आपण पाहात आहोत. देश जागतिक महासत्ता, आर्थिक महासत्तेच्या मार्गावर असताना देशाचे उद्याचे भविष्य आजचे विध्यार्थी घरामध्ये डांबून (शाळा,विध्यालये,महाविध्यालये) बंद ठेवणे योग्य नाही. जरी जे निर्बंध आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी,आजच्या अनलाँक प्रक्रियेतून सर्वच जनता विध्यार्थ्यासह मुक्तपणे संचार करत आहेत.
म्हणजे एकतर सध्याचे शैक्षणिक वर्ष रद्द करा - अन्यथा विध्यार्थी कोरोनाचा संक्रमीत होणार नाही यासाठी शिक्षण विभागास योग्य ते निर्बंध घालून शिक्षण सुरु करावे असे प्रतिपादन सोमनाथ भाऊ कांबळे यानीं शेवटी प्रतिपादन केले.
0 Comments