वाढदिवसाचा खर्च टाळून पंचशील नगरात केला रस्ता


कुर्डूवाडी दि.२३(क.वृ.): येथील नवीन प्राथमिक शाळेचे आदर्श सहशिक्षक नानासाहेब सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसावरील मोठा खर्च टाळून पंचशील नगर परिसरातील रस्ता मुरुमीकरण करुन नागरिकांच्या सोईचा करून देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील पंचशील नगरातील मुख्य रहदारीचा रस्ता चिखलमय झाला होता. मुख्य रहदारीच्या या रस्त्यावरून येणे - जाणे गरिकांना मुष्कील बनले होते.
दरम्यान सहशिक्षक नानासाहेब सोनवणे यांनी चांगल्या रस्त्याअभावी लोकांचे उठलेले हाल पाहून स्वत:चा वाढदिवस यंदा धुमधडाक्यात साजरा न करता वाढदिवसाच्या खर्चातून पंचशील नगर येथील रस्ता मुरूम टाकून चिखलमुक्त करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे रस्ता मुरूम टाकून वाहतुकीसाठी चांगला केला आहे.
सहशिक्षक सोनवणे यांनी केलेल्या या रस्त्याच्या कामामुळे ऐन पावसाळ्यात पंचशील नगर परिसरातील लोकांची सोय झाल्यामुळे नागरिकांनामधून सोनवणे यांना धन्यवाद दिले जात आहेत तसेच त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.
रस्त्याच्या कामावेळी पंचशील तरूण मित्र मंडळाचे मनोज सरवदे, महेंद्र सोनकांबळे, आण्णा शिंदे, नितीन डांगे, रोहन शिंदे सोमनाथ नाईकनवरे, शौकत पठाण, रोहित शिंदे, अथ॔व सरवदे, नैतिक सरवदे, आदित्य जावळे, मानव सरवदे, अभिजीत सरवदे, प्रणव डांगे, प्रफुल शिंदे, यश गायगवळी , सुशांत राजे , रोहित अस्वरे, यश वाघमारे, समाधान लोंढे, महेश कदम, कुणाला हानवते, प्रीतम लोंढे, मयूर शिंदे, अक्रम पठाण आदींसह नागरिक उपस्थित होते.
0 Comments