मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 7, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि.७(क.वृ.): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान होते. त्यांनी 'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' काढून अनेक घटकांना संघटीत करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले. अशा या महान आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages