मंगळवार दि.२९ रोजी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

केंद्र शाषणाचा कामगार विरोधी धोरणाचा निषेधार्थ सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ऐक तास तीव्र निदर्शने
तुळजापूर दि.२८(क.वृ.):- कामगारांचे वेतन देण्यास शाषणाकडे पैसा पण लोकप्रतिनिधी वेतन वाढवुन घेत असल्याचा आरोप करीत केंद्र शाषणाचे कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व प्रलंबित मागण्यासाठी देशव्यापी विरोधी दिन पाळणार असुन या पार्श्वभूमीवर मंगळवार दि.29 रोजी दुपारी दोन ते तीन या कालावधीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सं घटनेच्या वतीने काळ्या फित लावुन शाषकिय कार्यालयांन समोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी दिले.
शाषणाने कामगार विरोधी तीन विधेयक बहुमत जोरावर मंजूर केले असुन कामगार हिताचे अनेक कायदे रद्दबातल केले आहेत शाषण सार्वजनिक उधोगाचे खाजगीकरण करुन शाषकिय क्षेत्र खाजगी ञेक्षाकडे कडे देण्याचे रणणिति आखत आहे.
तरी कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंन्स पाळुन या निदर्शनात सहभागी व्हावै असे आवाहन जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे कार्याध्यक् ए एफ शेख सचिव बालाजी पांचाळ यशवंत डोलारे षबालाजी वाघमारे महादेव मैदपवाड झुंबर घाडगे धनंजय हाजगुडे संतोष माळी पदाधिकारीनी केले आहे.
0 Comments