मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली


सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले

मुंबई, दि.१८(क.वृ.):- ‘सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages