पुलाखाली पिकांना फुले शेंगा फळे लागत नसल्याने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्या - स्वाभीमानी शेतकरी संघट ना

तुळजापूर दि.१४(क.वृ.):- राष्ट्रीयमहार्गा पुलावरील विद्युत प्रकाशामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने याची स्थळ पाहणी करुन शाषणाने बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत निवेदन देऊन केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी राष्ट्रीय महामार्ग पुलावरील जवळील असलेल्या शेतातील पिक झाडे वाढत असुन त्यांना विद्युत प्रकाशामुळे फुले शेंगा व फळ लागत नाहीत त्यामुळे राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या शेतकऱ्यांना उत्पादन हाती येत नसल्यामुळे त्यांना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे शेतकऱ्यांचे होणारे अर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची स्थळ पाहणी करुन नुकसान चे पंचनामे करुन शाषाणा मार्फत अर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असुन नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इषारा स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने दिला आहे. हे निवेदन जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, गुरुदिस भोजणे, राजाभाऊ हाके, शांताराम पेंदे, डी.एस. सांळुके, शेषेराव सांळुके, संजय भोसलै यांनी दिली.
0 Comments