‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 9, 2020

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत

मुंबई, दि.९(क.वृ.): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कोरोनाला घाबरु नका, पण सतर्क रहा, या विषयावर वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 10  ऑगस्ट आणि मंगळवार दि.11 ऑगस्ट व बुधवार दि.12 ऑगस्ट रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेन्द्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी  शासनाने स्थापन केलेला  टास्क फोर्स, कोरोनासाठी  शासनाने निर्माण केलेल्या उपचार सुविधा, कोविड - 19 साठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीक विषयक जारी केलेल्या सूचना,  गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी, कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होवू नये यासाठी करण्यात येणारी कारवाई, सॅनिटायझर व मास्क कोणते वापरावे, सामाजिक अंतर जपताना घ्यायची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी या 'दिलखुलास' च्या मुलाखतीत केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages