Hot Posts

6/recent/ticker-posts

सणासुदीच्या काळात दुकाने जादा वेळ उघडे ठेवण्याची मागणी

सणासुदीच्या काळात दुकाने जादा वेळ उघडे ठेवण्याची मागणी

तुळजापूर दि.२०(क.वृ.): सणासुदीच्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजे पर्यत  दुकाने उघडे ठेवण्याची मागणी व्यापारी व छावा संघटना यांच्यावतीने नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांना निवेदन देवुन करण्यात आले. आगामी कालावधीत श्रीगणेशोत्सव व यहालक्षमी उत्सव गणपती उत्सव असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील  दुकानांची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत उघडे ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे व्यापारी संघटनेचे शहर कार्याध्यक्ष बालाजी भालेकर, छावासंघटनेचे जीवनराजे इंगळे, दत्तात्रय सोमाजी, मुकुंद दादा सरवदे, केशव धोत्रे, आनंत बुरांडे, गोविंद सरवदे, बाळासाहेब शेटे, उमेश गवते आदिंनी निवेदन देवून केली.

Reactions

Post a Comment

0 Comments