सोलापूरात उपचार घेत असलेल्या आरळीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्रशासनाला मिळाला दोन दिवस उशिरा
तुळजापूर दि.११(क.वृ.) :-तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील परंतु सध्या
सोलापूरात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने
गावात व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे, तालुका प्रशासनाने दखल घेऊन रुग्णांच्या संपर्कातील
23 जणांना स्वबसाठी ताब्यात घेतले असून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात
त्यांना घेऊन आणण्यात आले आहे.
दि.9 जुलै रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर रुग्णालयात
संबधित रुग्णाला त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्याची
कोरोना तपासणी करण्यात आली त्यात ते पॉझिटिव्ह निघाल्याची वार्ता समजताच
आरळी बु गाव गावकऱ्यांनी स्वतःहुन काळजी घेत बंद केले होते यात सर्वच
सार्वजनिक व्यवस्था व नागरिकांची वर्दळ थांबवली, सर्व
नागरीकांनी सम्पूर्ण गाव लॉक डाऊन करत जनता कर्फ्यु पाळला आहे,संमधित
रुग्णांचा अहवाल जिल्हा व तालुका प्रशासनास उशिरा प्राप्त झाल्याने गावात
दोन दिवस संभ्रमाचे वातावरण दिसून आले.
आरळी बु येथील रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवालाची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व प्रशाषणातील प्रमुख अधिकारी वर्गाने गावाला भेट देऊन परिसराची पाहणी करून कंटेंटमेंट झोन करण्यासाठी सूचना देऊन नागरिकांना
स्वतःच्या सुरक्षा बाबत काळजी घ्यावी अन काही लक्षणं दिसून येतात आरोग्य
तपासणी करण्यासाठी आवाहन केले आहे.
आरळी बु येथील डिसीसी बँक परिसर,पाटील गल्ली,विठ्ठल
रखमाई मंदिर परिसर सील करण्यात आला असून तो परिसर कंटेंटमेंट झोन घोषित आला
आहे,नागरिकांनी घराबाहेर विनाकारण पडू नये असे अवाहन आरोग्य विभागाकडून
करण्यात आले आहे.
0 Comments