लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दीच्या निमीत्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अकलूज दि.३१(क.वृ.): लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे 2020 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष असुन या निमीत्ताने जनसेवा संघटना व लहुजी शक्ती सेना नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळ व विविध सामाजिक संघटनेचे वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे संपुर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक नेते डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या मध्ये आज अखेर सुमारे 2000 रक्तदान केले आहे. याच अनुषंगाने शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी अकलुज येथील अण्णाभाऊ साठे स्मृतिथळ जुने एस टी शेजारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सदरचा कार्यक्रम सोशल डिस्टेंन्स व शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम अटी पाळून केला जाईल तरी सर्व सुजान नागरिकांनी या कार्यक्रमात रक्तदान करून या कठीण काळात कोरोना योद्धयाची भुमिका बजावावी असे आवाह महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, लहुजी शक्ती सेना व नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments