कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देताय मग त्यावर व्याज का लावता - संदिप मुटकुळे
मंगळवेढा- (क.वृ.):- कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने अनेकांचे उत्पन्न बंद आहे.याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. कारण या काळात आरबीआयने कर्जाचे हप्ते ३१ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असलीतरी त्यावरील व्याज मात्र वसूल केलं जाणार आहे.आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला एक मोठा प्रश्न पडला आहे.
बँका त्यावर व्याज कसं लावता हा प्रश्न सर्वात मोठा पडला आहे.आरबीआयने आदेश दिला तो बँकांनी पाळा पण ३१ऑगस्ट नंतर हप्ते भरून घेतले जाणार आहेत.सामान्य जनतेला प्रश्न पडतो की बँकांनी जर तीन महिन्यासाठी कर्ज माफ केले आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसे काय लावू शकता ही आमची मुख्य काळजी आहे.त्यासाठी सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आतातरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि आरबीआयने व केंद्र सरकारने आणि महाविकास आघाडी सरकारने सर्व प्ररकारचे व्याज माफ करावे.कारण आता जनतेकडे पैसा उपलब्ध नाही.
त्यासाठी सर्व बँका व फायनान्स,बचत गट,यांनी हप्ताचे व्याज दंड न घेता फक्त हप्ते भरून घ्यावे,ते हप्ते भरून घेत असताना टप्या टप्याने भरून घ्यावे जर बँकांनी बंधन बँक,बुलढाणा बँक,समर्थ बँक, एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक,बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा,विटास फायनान्स,बजाज फायनान्स,मायक्रो फायनान्स
यांच्याकडून महिला बचत गटाने कर्ज घेतले आहे त्या कर्जाची वसुली थांबून त्यांचे व्याज व दंड माफ करावे या सर्व अधिकारी यांनी गोरगरीब जनतेला त्रास देणाचे काम केले तर शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने जनआंदोलन केले जाईल अशा इशारा शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे दिला आहे.
0 Comments