आता २१ जूनला जगाचा अंत होणार?
अमेरिके (वृ. सेवा):- जगाचा अंत होणार अशा अफवा किंवा गृहीतके या आधी खूप वेळा समोर आली. अगदी जवळचा इतिहास पहिला तर १९९९, २००३ आणि त्यानंतर २०१२ या वर्षात तर या अफवांना खूप पीक आले होते.
त्यांचप्रमाणे आता २१ जूनला जगबुडी होणार असल्याचा दावा करण्यात आला असून २१ जून रोजी जगाचा अंत होणार असल्याचा दावा नव्याने करण्यात आला आहे. जगबुडीचे दावे करणाऱ्या मंडळींनुसार, वर्ष २०२०मध्ये पृ्थ्वीवर कधी नव्हे ते संकट ओढावलं आहे.
माया संस्कृतीच्या कालगणनेनुसार जगाचा अंत जवळ आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. याआधी याच कालगणनेत करण्यात आलेले दावे चुकीच्या गृहीतकावर आधारलेले होते. त्यामुळेच भविष्यवाणी चुकीली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे आता सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे. जाणून घेऊयात यातील तथ्य- जगाच्या अंताचा दावा ग्रेगोरिअन कालगणनेच्या आधारे करण्यात येत आहे. ही कालगणना १५८२ मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळेपासून वर्षातून ११ दिवस कमी झाले होते.
११ दिवस कमी वाटत असले तरी २८६ वर्षात हे सातत्याने वाढत गेले आहेत. जगभरात चालणाऱ्या अशा घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांचा दावा असा दावा आहे की, आपल्याला वर्ष २०१२ मध्ये असालया हवे होते.
या दाव्याला शास्त्रज्ञ पाओलो तगलोगुइन यांच्या ट्विटमुळे अधिक बळ मिळाले आहेत. वैज्ञानिक पाओलो यांच्या ट्विटनंतर अनेकांनी २१ जून २०२० हाच दिवस २१ डिसेंबर २०१२ असल्याचा दावा केला आहे.
वर्ष २०१२ मध्येदेखील अशाच प्रकारे दावे करण्यात आले होते. या दाव्याची सुरुवात एका वेगळ्या दाव्याने झाली होती. सुमेरिअन लोकांनी निबीरू ग्रहाचा शोध लावला असल्याचा दावा करण्यात आला.
निबिरू ग्रह पृथ्वीकडे येत असल्याचा दावा करण्यात आला होता. याआधी मे २००३मध्ये ही जगाचा अंत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर जगबुडीची तारीख २१ डिसेंबर २०१२ करण्यात आली.
परंतु अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने सांगितले की, जगाचा अंत होणार असल्याच्या दाव्याला कोणताही शास्त्रीय, वैज्ञानिक आधार नाही. अशा प्रकारचे दावे फक्त पुस्तके, चित्रपट आणि इंटरनेटवर करण्यात येतात.
0 Comments