आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्याकडून
प्रदक्षिणा मार्गाची पाहणी
पंढरपूर,दि.25(क.वृ.): विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची पाहणी केली.
यावेळी डॉ.म्हैसेकर यांच्या समवेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते.
यावेळी आयुक्त म्हैसेकर यांनी नाथ चौक,, महाव्दार घाट, नामदेव पायरी, उत्तर दरवाजा आदी ठिकाणीची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधितांना दिल्या.
0 Comments