महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांचा आकडा ५२ वरून ६३ वर पोहचला
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा
हा 63 पर्यंत पोहोचल्याचे सांगितले. शुक्रवारी हा आकडा 52 इतका होता, एकाच दिवसांत ही
संख्या 11 ने वाढली आहे. या रुग्णांमध्ये 10 जण हे मुंबईचे आहेत तर एक जण हा पुण्याचा आहे.
आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णांबाबत माहिती देताना सांगितले की 8 रुग्ण हे परदेश प्रवासाचा इतिहास असलेले
आहेत तर उर्वरीत 3 जण हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले आहेत.शुक्रवारपासून मुंबईतून आपल्या मूळ गावी जाणान्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यासगळ्यांमुळे रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेतसांगितले की त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता आणि ज्यादा गाड्या सोडून ही गर्दी कमीकरण्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना विनंती करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांची ही बाब तत्काळ मान्य केली आहे.शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेबठाकरे यांनी चाचणीच्या सुविधा वाढवल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका घेतली होती. आरोग्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही टेस्टींग लॅबची संख्या वाढवावी असा आग्रह धरला. महाराष्ट्रातील मेडीकल कॉलेजमधल्या रुग्णालयात ICMR च्या नियमांचे कोटेकोर पालन करून या लॅब सुरू करायला तयार असल्याचं टोपे यांनी सांगितलं, मात्र त्यासाठी केंद्राकडून परवानगी आवश्यक आहे असं ते म्हणाले.केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचे मुंबईतील लोकल सेवा बंद झाली पाहिजे असे आजही मत असल्याचे टोपेयांनी सांगितले. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,त्यामुळे लोकल आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा असल्याचे टोपेयांनी सांगितले. तरीही जर गर्दी कमी होत नसून ती वाढणारच असेल तर मग नाईलाजास्तव लोकल सेवाहीबंद करावीच लागेल असं ते म्हणाले.

0 Comments