एसीचा वापर कमी करण्याच्या शासकीय कार्यालयांना सूचना
महाराष्ट्र शासनाने सरकारी कार्यालयांमध्ये एसीचा वापर कमी करण्यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.
थंड हवेमध्ये हा विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतो. एसीमुळे तयार होणाऱ्या थंड हवेत हा विषाणू सात ते आठ
तास जिवंत राहू शकतो. तसेच एसीच्या डक्टमध्येही हा विषाणू राहून तो नंतर इतरांना बाधित करू शकतो
असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे एसीऐवजी खिडक्या, दारं उघडी ठेवून पंखे लावून व्यवस्था केली तर
या विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होऊ शकते. हे लक्षात घूनच सदर परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
जे परिपत्रक जारी केलं आहे ते जागतिक आरोग्य संस्था आणि केंद्र सरकारच्या सूचनावलीच्या अधीन राहूनच
तयार केल्याचं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

0 Comments