अकलूजमध्ये हॉर्स रायडींग प्रशिक्षण केंद्राची उभारणी
-धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज (प्रतिनिधी): घोडे स्वारीतील आंतरराष्ट्रीय खेळ प्रकारची माहिती व्हावी, यामुळे अकलूज व परिसरातील युवकांना या खेळ प्रकारातील करीअरच्या संधी माहिती व्हाव्यात व येथून आंतरराष्ट्रीय घोडे स्वारीचे खेळाडू तयार व्हावेत याच उद्देशाने शिवरत्न स्पोर्टस् अकॅडमीच्या माध्यमातून हाॅर्स रायडींग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे असे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. अकलूजचा घोडेबाजार आज राष्ट्रीय पातळीवर नावाजला गेला आहे.या बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.या घोडेबाजाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातही घोडयांची आवड निर्माण होऊ लागली आहे. अश्वांची आवड असणारे लोक तसेच शेतकरीही घोडे खरेदी करत आहेत, त्यांनी खरेदी केलेली घोडे वापरात आले पाहिजेत, यासाठी त्यांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे घोडेस्वारीचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहोत. ऑलिम्पिक स्तरावरील ,आंतरराष्ट्रीय पातळीवरील घोडेस्वार खेळाडू अकलूज व परीसरात तयार करण्याचे प्रशिक्षण शिवरत्न हाॅर्स रायडींग अकॅडमीच्या माध्यमातून मिळणार आहे. १ एप्रिल २०२० पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अकॅडमीच्या व्यवस्थापन समिती सदस्य पदी डाॅ.रमेश पताळे, अमित कुंभार, योगेश वेळापूरे यांची निवड करण्यात आली

0 Comments