कोषागार दिनानिमित्त रक्तदान शिबीर, व्याख्यान
सोलापूर, दि. 01 - कोषागार दिनानिमित्त रक्तदान शिबीर, पर्यावरण संरक्षणासाठी नो व्हेईकल डे आणि व्याख्यान, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिल्हा कोषागार कार्यालयात आज कोषागार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शशिकांत मोकाशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी कायद्याचे ज्ञान सर्वांना आवश्यक असून कायद्याबाबत सर्वांनी साक्षर असावे, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश आवताडे, श्री. जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती रुपाली कोळी, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मोमीन, श्री. यादव व श्री. वाळुजकर आदि उपस्थित होते
0 Comments