Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक चारमध्ये नागरिकांशी थेट जनसंवाद

 प्रभाग क्रमांक चारमध्ये नागरिकांशी थेट जनसंवाद






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सीए सुशील बंदपट्टे यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर देत थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी न्यू बुधवार पेठ परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मागील तीन ते चार दिवसांपासून न्यू बुधवार पेठ, मराठा वस्ती, जम्मा चाळ, श्रीराम नगर आदी भागांत त्यांचा घराघरांत जाऊन प्रचार सुरू आहे. या वेळी नागरिकांनी नळपाणी, रस्ते, ड्रेनेज, घंटागाडी वेळेवर न येणे, अस्वच्छता आदी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. या समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आल्या नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले.

काही भागांत तर विद्यमान नगरसेवक कधीच पोहोचले नसल्याची तक्रार नागरिकांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले. ड्रेनेज लाईन, अस्वच्छता, पाण्याचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव अशा अनेक मुद्द्यांवर पॅनलच्या वतीने प्रभावी उपाययोजना करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले.

एकूणच सुशील बंदपट्टे यांच्या ‘होम टू होम’ प्रचाराला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी उपस्थित केलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर पॅनलच्या वतीने ठोस ग्वाही देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Reactions

Post a Comment

0 Comments