Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहारतर्फे रितू नलवडेंचा सत्कार

 प्रहारतर्फे रितू नलवडेंचा सत्कार




 टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात कार्यरत असलेले सोमनाथ नलवडे यांची कन्या कु. रितू सोमनाथ नलवडे हिने अकोला येथील महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस. (BAMS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.

हा सत्कार प्रहार संघटनेचे धाराशिव व सोलापूर संपर्क प्रमुख अमोल जगदाळे व वडार पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजकुमार धोत्रे यांच्या हस्ते फेटा बांधून करण्यात आला.

या कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे माढा तालुकाध्यक्ष अनिल जगताप, टेंभुर्णी पत्रकार संघाचे हरिश्चंद्र गाडेकर, पत्रकार गणेश चौगुले, संतोष वाघमारे, धनंजय भोसले, सोमनाथ नलवडे, रमेश ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रितू नलवडेच्या या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments