बालदिनाच्या निमित्ताने ऑर्किड मध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय फन फेअर चे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उदघाटन सोलापूर विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषयाच्या विशेषज्ञ सौ.अनिता शिवाजी शेळके-सराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
फन फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे प्राचार्या रुपाली हजारे यांनी सांगितले.
फन फेअरच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी जवळपास ५० हुन अधिक फूड स्टॉल व गेम स्टॉल उभे करून आपले आर्थिक कौशल्य सिद्ध केले.या दोन दिवसीय उपक्रमास पालक वर्गानी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तृप्ती चाटी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.png)
0 Comments