Hot Posts

6/recent/ticker-posts

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली

 २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली


  

 

 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांच्या व नागरिकांच्या सन्मानार्थ तसेच पंढरपूरचे वीर सुपुत्र शहीद मेजर कुणालगिरी गोसावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी रक्तदान शिबिरात ३३३ रक्त पिशव्या संकलित झाल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली. 
तसेच रुक्मिणी सभागृह, पोलीस संकुल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन देखील करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
   रुक्मिणी सभागृह, पोलीस संकुल येथे पंढरपूर  उपविभागातील पोलीस प्रशासन व पंढरपूर ब्लड बैंक व बजाज ब्लड बैंक पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,  पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके, . टि.वाय. मुजावर,  रेखा घनवट , सहा.पो.नि सांगर कुंजिर, पोसई हमीद शेख तसेच , पंढरपूर ब्लड बँकेचे डॉ. प्रसाद खाडिलकर, बजाज ब्लड बँकेचे डॉ. मंदार सोनवणे उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी मुंबईवरील २६/११ (२००८) दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचं रक्षण, नागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक, अग्निशमन,सर्वच सुरक्षा दलांच्या अधिकारी, जवानांच्या असामान्य धैर्य, शौर्य, पराक्रमाबाबत माहिती दिली. तसेच विदयार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा देवून प्रशासकीय सेवेत येण्याकरीता चांगल्या प्रकारे अभ्यास करावा याकरीता मार्गदर्शन केले. यावेळी तसेच रक्तदानाचे महत्व विशद करुन यावर्षी रक्तदान शिबीराचे हे ०९ वे वर्षे असून आतापर्यंत सुमारे ४००० रक्त बॅगा संकलन करून यापुढेही या सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
 यावेळी  उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी वैदयकीय क्षेत्रात रूग्णांना होणारा रक्ताचा अपुरा पुरवठा व त्याकरीता पोलीस दलातर्फे आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारे प्रत्येक युवकव युवतीने सामाजिक कार्यात व देशसेवेकरीता तत्पर तयार राहीले पाहीजे अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला.
यावेळी रक्तदान शिबीरात पंढरपूर व परिसरातील सर्व स्तरातील लोकांनी स्वयंस्फुर्तीने मोठया प्रमाणात रक्तदान केले यामध्ये विविध कॉलेजच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता
 
Reactions

Post a Comment

0 Comments