Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ विकासासाठी सर्वसमावेशक व्हिजन जाहीर; गृहनिर्माण, रस्ते, व्यापारी संकुल, क्रीडा व सुरक्षिततेचे महत्त्वाकांक्षी आराखडे — सोमेश क्षीरसागर यांची घोषणा

 मोहोळ विकासासाठी सर्वसमावेशक व्हिजन जाहीर; गृहनिर्माण, रस्ते, व्यापारी संकुल, क्रीडा व सुरक्षिततेचे महत्त्वाकांक्षी आराखडे — सोमेश क्षीरसागर यांची घोषणा

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या स्वरूपाची योजना आज जाहीर करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक उभारणी समिती सदस्य तसेच भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमेश क्षीरसागर यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. गृहनिर्माण, पाणीपुरवठा, रस्ते, व्यापार, क्रीडा, आरोग्य आणि सुरक्षिततेपर्यंत बहुआयामी विकासाचा आराखडा त्यांनी मांडला.
रमाई आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी पुढाकार. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भूमिहीन कुटुंबांसाठी शहरात ३०० परवडणारी घरे उभारण्याचे उद्दिष्ट. अंदाजे १८ कोटी निधी मिळवण्याचा प्रयत्न. पाणी व गटार योजनेंतर्गत सुरू असलेली शहर पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना लवकरात लवकर, निकृष्ट दर्जा न ठेवता पूर्ण करण्याचे आश्वासन. शहरातील प्रत्येक घरासमोर दररोज नियमित घंटागाडी सेवा. मोहोळ शहर स्वच्छ, नीटनेटके व सुंदर बनवण्यासाठी स्वतंत्र उपक्रम सुरू करण्याचा संकल्प. रस्ते विकास आणि दळणवळणाच्या सुविधा देवून शहराला नवी दिशा, मोहोळ शहर रस्ते विकास आराखडाच्या माध्यमातून एकूण २०० कोटींचा सर्वसमावेशक रस्ता आराखडा मंजूर करून त्यासाठी निधी मिळवण्याचे उद्दिष्ट.
 शिवाजी महाराज चौक – मोहोळ रेल्वे स्टेशन रस्ता, नरखेड रोड – श्री नागनाथ मंदिर मार्ग, स्थिमोलंघन पांड – डोकेवस्ती (श्री समर्थ नगर मार्गे) – ढोक बाभुळगाव रस्ता हे महत्त्वाचे प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शिवाजी महाराज चौक व्यापारी संकुल (१०० गाळे):
शहराच्या मध्यभागी असलेल्या आरक्षित जागेत १२ कोटींचे संकुल उभारण्याचा प्रस्ताव. त्यामुळे व्यापाऱ्यांना आधुनिक जागा उपलब्ध होणार. व्यापारी संकुल उभा करून व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ढोक बाभुळगाव व्यापारी संकुल:
ढोक बाभुळगाव रोडलगत आरक्षित भूखंडावर ५ कोटींचे नवे व्यापारी संकुल. तसेच नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीराम नगर वसाहतीलगतच्या जागेत बहुउद्देशीय इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. योगा प्रशिक्षण केंद्रासह नागरिकांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी शहरात योगा केंद्र. शहरातील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठ, वसाहतींमध्ये संपूर्ण CCTV नेटवर्क. शहरात आरक्षित जागेवर आकर्षक व आधुनिक सुसज्ज उद्यान उभारण्याची घोषणा. मोहोळच्या विकासासाठी या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, क्रीडा आणि व्यापाराच्या प्रगतीसाठी सुस्पष्ट, अर्थपूर्ण आणि अमलात आणता येण्यासारखा ब्लूप्रिंट त्यांनी मांडला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांचे हे व्हिजन मोहोळमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments