आर्या कॉलेज ऑफ फार्मसीची टेंभुर्णी मधील जलशुद्धीकरण केंद्रास भेट
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
टेंभुर्णी येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायत व टेंभुर्णी एमआयडीसी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पाण्याचे शुद्धीकरण कसे केले जाते, कोणत्या प्रोसेस वापरल्या जातात,व शुद्धीकरण केलेल्या पाण्याचे वितरण कसे केले जाते याची सविस्तर माहिती घेतली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments