Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय साॅफ्ट टेनिस स्पर्धेसाठी शिवा हडपदची निवड

 राज्यस्तरीय साॅफ्ट टेनिस स्पर्धेसाठी शिवा हडपदची निवड




        सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साॅफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील शिवा हडपद याची निवड झाली आहे.
नुकतेच पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत हडपद यांनी तृतीय क्रंमाक पटकाविला आहे. दि २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान  बारामती येथे होणार्‍या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
    या खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल कुंभार,सुरेश बिराजदार,अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
    या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार ,प्राचार्य रविशंकर कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे , सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments