पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या १९ नोव्हेंबर १९१२ रोजी स्थापित झालेल्या पंढरपूर अर्बन बँकेचा ११४ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. आद्य संस्थापकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात झाली. परमात्मा पांडुरंग व लक्ष्मी मातेचे पूजन करण्यात आले श्रद्धेय लक्ष्मण इनामदार व परम श्रध्येय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार बँकेचे चेअरमन सतीश मुळे व संचालक मंडळाचे वतीने अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कुटुंबप्रमुख मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांनी बँकेच्या इतिहासाची गौरव गाथा त्यांच्या शब्दात वर्णन केले व व्यवसाय विस्तार कसा केला याची माहिती सांगितली. यावेळी बँकेचे विद्यमान चेअरमन यांनी बँकेला लाभलेले बँकेचे सर्व सभासद व त्यांचा असणारा विश्वास हेच आपल्या बँकेच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे हा ग्राहकांचा विश्वास आपले बँकेवरती सदैव वाढत राहो व उत्तरोत्तर अशीच बँकेची प्रगती होत राही अशी रुक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विरधे यांनी सर्व उपस्थित मान्यवर ग्राहकांचे व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री दादा वेदक यांनी भेट देऊन बँकेचे कामकाज बाबत समाधान व्यक्त करीत बँकेने पुढील असाच शाखा विस्तार करीत २०० वर्ष पूर्ण करावीत.
पंढरपूर अर्बन बँक हा सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास संपादन करून भावनिकतेशी नाळ जोडलेली ११३ वर्षाची उज्वल परंपरा लाभलेली बँक आहे यावरील सर्व संचालक मंडळ व सेवक यांची शिस्त व सेवा, समर्पण या भावनेने कार्य करण्याची सहकारातील वृत्ती ही बँकेला अधिक उंचीवर घेऊन जात असल्याबाबत उपस्थित ग्राहक वेगाने याबाबत विशेष समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी, संचालक रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, राजाराम परिचारक, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ञ संचालक अतुल कौलवार, प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड, संचालिका संगिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments